मुरगूड ( शशी दरेकर ) : राजू आमते युवा मंच व सस्पेन्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खास दसऱ्यानिमित्त विशेष महीलांसाठी अंबााई मंदीर परिसरामध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. होम मिनिस्टर प्रथम क्रमांक पटकावला आहे तो सौ कविता विक्रम रावण यांनी तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून सौ. सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील(वहीनीजी) होत्या. तर महीला राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. शितल फराकटे, मुरगूडच्या माजी नगराध्यक्षा सौ.रेखा सुधीर सावर्डेकर, महीला राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या शहराध्यक्षा व माजी नगराध्यक्षा सौ.नम्रता नामदेव भांदीगरे, माजी नगराध्यक्षा सौ.माया सुनिल चौगले, महीला राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या शहर उपाध्यक्षा सौ.अनिता संजय जाधव, महीला राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या शहर उपाध्यक्षा सौ.उषादेवी शिवाजीराव सातवेकर, तलाठी सौ.विद्या रणजित सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमादरम्यान ग्रामीण रुग्णालय,आरोग्य कर्मचारी, मुरगूड पोलीस स्टेशन मधील कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत सौ. कविता विक्रम रावण यांचा प्रथम क्रमांक आला.तर सौ.शिवानी रोहन भाट व सौ.आकांक्षा प्रशांत माने यांचा अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक आला.प्रमुख पाहूण्यांचा शुभहस्ते विजेत्याला मानाची पैठणी देण्यात आली.तर उपविजेत्यांना मिक्सर व कुकर देण्यात आला. कार्यक्रमा साठी दिग्विजयसिंह पाटील, सत्यजितसिह पाटील,राजू आमते, नामदेव भादिगरे, समाधान पोवार, दिग्विजय चव्हाण, सौ. शोभा चौगले, , धनश्री चव्हाण आदि उपस्थित होते. स्वागत सौ.आनिता जाधव, यांनी तर प्रास्ताविक सौ.आश्विनी आमते यांनी केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिनेअभिनेते मा.मदन पलंगे यांनी केले.