मुरगूड (शशी दरेकर) : महाराष्ट्र राज्यातील राज्यसरकारमध्ये आठ महिन्यापूर्वी झालेल्या सत्ता बदलामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे समर्थक म्हणून खासदार संजय मंडलिक यांच्याकडून जन्मभूमी या नात्याने मुरगुड शहर व परिसराला संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद मिळावे अशी कार्यकर्त्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुरगूडमध्ये या योजनेसाठी यापूर्वी सुरुवातीला दिगंबर परीट यांनी पंधरा वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनीही या पदावर काम पाहिले. माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार वंडकर यांनाही संजय निराधार समितीचे सदस्य म्हणून काम करता आले. अलीकडील काही महिने सामाजिक कार्यकर्ते राजू आमते यांनाही या पदावर काम करण्याची संधी मिळाली.
आठ महिन्यापूर्वी राज्यातील राजकीय घडामोडीमध्ये झालेल्या स्थित्यंतरातून मुख्यमंत्रीपदी एकनाथराव शिंदे यांना संधी मिळाली. खासदार संजय मंडलिक यांनी एकनाथराव शिंदे यांची बाजू उचलून धरत राज्य सरकारच्या बाजूने आपले बळ दिले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे खासदार संजय मंडलिक यांच्याकडून जन्मभूमीला हे अध्यक्ष पद मिळू शकते.
गेली 15 वर्ष संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे सरसेनापती भैय्या माने यांच्याकडे आहे. राज्यातील स्थित्यंतरामुळे नव्याने संजय निराधार योजनेच्या पदाधिकाऱ्यांची रचना केली जाणार आहे. त्यामुळे या रचनेमध्ये खासदार मंडलिक यांचे जन्मभूमी म्हणून या योजनेचे अध्यक्ष पद इथल्या एखाद्या कार्यकर्त्याला मिळावे अशी कार्यकर्त्यांची माफक अपेक्षा आहे.
तालुका पातळीवरील संजय गांधी निराधार योजनेमध्ये एक अध्यक्ष व त्यांनी निवडलेले समिती सदस्य या योजनेतील लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करून योजनेची संधी देण्याचे काम करीत असतात समितीतील सदस्यांनी दिलेल्या समाजातील अनेक नागरिकांना दारिद्र्यरेषेखाली अनेक नागरिकांना या योजनांचे लाभ मिळू शकतात. मुरगूड परिसरातील दारिद्र्यरेषेखालील अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने या योजनेचे अध्यक्षपद मुरगूड परिसराला मिळावे ही कार्यकर्ते व नागरिक यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
संजय निराधार योजना आणि नियम
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
• वय 65 पेक्षा जास्त असणाऱ्या
दारीद्रयरेषेखालील लोकांसाठी इंदिरा
गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन
योजना
•वय 40 ते 60 च्या दारीद्रयरेषेखालील
विधवा महिलेसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय
विधवा निवृत्तीवेतन योजना
•वय 18 ते 60 च्या आतील
दारीद्रयरेषेखालील 80
टक्केहूनअधिक अपंग किंवा दुर्धर
आजारग्रस्त असलेल्यांसाठी इंदिरा
•गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
वय 65 पेक्षा जास्त, कुटुंबाचे वार्षिक
उत्पन्न रु. 21000 पेक्षा कमी
असलेल्यांसाठी व कोणत्याही अन्य
शासकिय योजनेचा लाभ न
घेतलेल्यांसाठी श्रावणबाळ सेवा राज्य
निवृत्तीवेतन योजना
• मिळकती कुटुंब प्रमुख मयत व्यक्ती
असल्यास दारीद्र्यरेषेखालील
कुटुंबाला राष्ट्रीय कुटुंब योजना
(तहसिल विभाग)यातून
वारसास रु. 20 हजारचा धनादेश
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,