दहा वर्षे पूर्ण झालेले आधार कार्ड अद्यावत करा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर दि. 3 : शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार दर दहा वर्षांनी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आधार तयार होवून दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी आपल्या आधार कार्डवरील माहिती त्वरीत अद्ययावत करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

Advertisements

आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाइल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधार कार्ड नोंदणी झाली असल्याची शक्यता असते. आधार कार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदीचे अद्ययावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दर दहा वर्षांनी आधार अद्यावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे त्यांनी आपल्या नजिकच्या आधार केंद्रावर जाऊन आधार अद्यावत करुन घ्यावे.

Advertisements

जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या नियंत्रणांर्तगत आधारकार्ड अद्ययावतीकरणाच्या कामकाजासाठी कँपचे नियोजन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले असून त्याचे सविस्तर वेळापत्रक www.kolhapur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. यासाठी शासनाने डेमोग्राफिक अपडेटसाठी (नाव, पत्ता, जन्म दिनांक, लिंग, मोबाइल क्रमांक, ई- मेल) 50 रुपये तसेच बायोमेट्रिक अपडेटसाठी (हाताच्या बोटांचे ठसे, डोळ्यातील रेटीना स्कॅन) 100 रुपये शुल्क निर्धारित केले आहे. परंतु, नागरिकांनी स्वत: myAadhaar पोर्टल (myaadhaar.uidai.gov.in) वरुन 15 मार्च ते 14 जून 2023 या कालावधीत आधार कार्डवरील माहिती अद्ययावत केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही व त्यानंतर 25 रु. शुल्क आकारले जाईल.

Advertisements

ज्या नागरिकांचे आधार तयार होवून दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी तात्काळ आपले आधार अद्ययावत करुन शासनास सहकार्य करावे. नागरिकांनी आपले आधार रद्द होणार नाही याची दक्षता घ्यावी व भविष्यकाळातील गैरसोय टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!
PM Kisan 20 वीं किस्त: कब और कैसे पाएं ₹2000? India’s Hottest Picks: Top 10 Trending Stocks of 2025! जागतिक वन दिन 2025 Book HSRP Plate Process Step by Step kagal vidhansabha voting 2024