collector
बातमी

दहा वर्षे पूर्ण झालेले आधार कार्ड अद्यावत करा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर दि. 3 : शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार दर दहा वर्षांनी आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आधार तयार होवून दहा वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांनी आपल्या आधार कार्डवरील माहिती त्वरीत अद्ययावत करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. […]