कोल्हापूर : देशाच्या व आपल्या विकासासाठी २०२४ च्या निवडणूकीत पुन्हा एकदा मोदी यांना निवडून देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते लोकसंपर्क व लोकसंवाद या सूत्रावर भाजप सरकार चालवते २००४ ते २०१४ पर्यंत मनमोहन सिंग पंतप्रधान होते. परंतु त्यांना पंतप्रधान कोणीच मानत नव्हते. तर इतर मंत्री स्वतःला पंतप्रधान मानायचे. निर्णय निर्णय क्षमता नव्हती. १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार, पाकिस्तानातून घुसखोरी होती. असले सरकार त्यावेळी होते. शरद पवार मंत्री असताना त्यांनी काय केले? असा सवाल करत अमित शाह यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
पण भाजप सरकार आल्यानंतर ३७० कलम हटवले. कोरोना काळात १३० कोटी जनतेला मोफत जनतेचे मोफत लसीकरण केले ८० कोटी लोकांना मोफत धान्य वितरण, उज्वला गॅस योजना, शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये, तसेच आयोध्या मंदिराचे निर्माण, तिहेरी तलाक बंदी असे महत्त्वाचे आणि धाडसाचे निर्णय घेतले. संपूर्ण विश्वात भारताला महासत्ता बनवण्यासाठी मोदींनी प्रत्येक देशाशी संपर्क साधला. अर्थतंत्रामध्ये भारत अकराव्या स्थानापासून आता पाचव्या क्रमांकावर आहे. सत्तेसाठी सिद्धांताचा बळी कधी दिला नाही. महाराष्ट्रातदेखील बहुमताची अपेक्षा नाही.तर संपूर्ण विजय हवा आणि तो विजय फक्त शिवसेना आणि भाजप युतीच खेचून आणू शकते. असेही ते म्हणाले.
कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा
खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा अमित शाह यांच्यासमोर मांडला. ते म्हणाले, आता संपूर्ण विश्वात भारताचे वर्चस्व आहे. सर्वसमावेशक बजेट भारताच्या इतिहासात प्रथमच भाजप सरकारने सादर केले. पण पश्चिम महाराष्ट्र हा सहकार रुजलेला प्रांत आहे. आणि अमित शाह हे सहकार मंत्री झाल्यानंतर त्यांनी मंत्रालयाची स्थापना केली. साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्स हटवला.
राज्य सरकारनेदेखील कोल्हापूरच्या विकासात भर घातली. भाजप सरकार आल्यानंतर कोल्हापूरकरांवरचा जाचक टोल हटवला गेला. ८० कोटी रुपयांचे विमानतळ साकारले. तसेच सातारा- कागल सहा पदरी मार्ग, बास्केट ब्रिज इत्यादी कामे आत्ता मार्गास लागलेली आहेत. परंतु वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर अंबाबाई तीर्थक्षेत्र म्हणून विकाससास यावे, तसेच सर्किट बेंच आणि इथेनॉल निर्मिती योजनेस मदत अशा विविध मागण्या अमित शाह यांच्यासमोर कोल्हापूरच्या विकासासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मांडल्या.
महाराष्ट्राला फास्टट्रॅकवर आणण्याचे काम भाजपने केले आहे. कोल्हापुरातून प्रचाराची सुरुवात अंबाबाईच्या आशीर्वादाने करून भाजपला यश मिळालेले आहे. परंतु मिळालेले यश हे टिकले नाही. खुर्ची महत्त्वाची ठरली. आणि २५ वर्षाची युती त्यांनी तोडली. पण अडीच वर्षात ते रस्त्यावर आले. शिवसेना हा विचार आहे.
त्या विचाराने जगण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केले. म्हणूनच आज भाजप आणि शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. २०२४ च्या विजय संकल्पची महाविजय अभियानाची सुरुवात देखील कोल्हापुरातच आई अंबाबाईच्या आशीर्वादाने करत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आठ वर्षांनी अमित शाह कोल्हापुरात आले आहेत. भाजपचा विचार हा संपूर्ण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १२ विधानसभेतील प्रत्येकी २५ अशा तीनशे सदस्यांची बैठक देखील यावेळी आयोजित करण्यात आली. याला अमित शाह यांनी मार्गदर्शन करावे तसेच प्रत्येक जिल्ह्याचे भाजपचे कार्यालय हे भव्य व मोठे असावे म्हणूनच या कार्यालयांचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्याचा घाट घातला. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, संजयकाका पाटील, अमल महाडिक, सुरेश खाडे, महेश जाधव, गोपीचंद पडळकर, सुरेश हळवणकर, राहुल चिकोडे, सत्यजित कदम, प्रकाश आवाडे उपस्थित होते.