कागल: देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा. शरदचंद्र पवारसाहेबांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यावतीने डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे थेट प्रक्षेपण आयोजन केले होते. तसेच विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत नियुक्तीपत्र वाटप करुन आदरणीय खा.शरदचंद्र पवारसाहेबांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कृष्णात पाटील,दिनकरराव कोतेकर, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, अशोकराव नवाळे, नारायण पाटील, तात्या पाटील, प्रमोद पाटील, नेताजी मोरे, राजेंद्र पाटील, दत्ता पाटील केनवडेकर, शहराध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक प्रवीण काळबर, नितीन दिंडे, सतीश घाडगे, शशिकांत नाईक, संग्राम गुरव, इरफान मुजावर शानुर पखाली, नवाज मुश्रीफ, राहुल पाटील यांच्यासह आजी-माजी नगरसेवक इतर मान्यवर उपस्थित होते.