कागल येथून दोन दुचाकी चोरीस

कागल : कागल येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली.

Advertisements

कागल येथील बहुउद्देशीय सभागृहानजीकच्या नवीन इमारतीसमोर प्रकाश शिवाजी मगदूम (रा. बामणी, ता. कागल) यांनी लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर चोरट्याने चोरून नेली,

Advertisements

तर जयसिंगराव पार्कमध्ये बँक ऑफ बडोदा येथे लावलेली कृष्णाजी श्रीनिवास कुलकर्णी (रा. जयसिंगराव पार्क, कागल) यांची हिरो होंडा स्प्लेंडर चोरट्याने चोरून नेली.

Advertisements

कागल शहरामध्ये वाढत्या चोऱ्यामुळे पोलीस खात्याचे कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश स्पष्ट दिसत आहे. कागल पोलीस ठाणे हे निवृत्ती केंद्र बनले आहे निवृत्ती जवळ आलेलेच अधिकारी कागल पोलीस ठाण्यात नियुक्त केले जातात याच गणित काय नागरिकांना कळेना झाले आहे.

एक सजग नागरिक
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!