मुरगूड ( शशी दरेकर ) : आय एस ओ मानांकन प्राप्त असलेल्या एम .जे. अँग्रो इंडस्ट्रीजच्या नवीन अद्यावत कार्यालयाचे उदघाटन समारंभ कोथरूड पुणे येथिल चांदणी चौक येथे मोठया उत्साहात पार पडला.
आम. हसन मुश्रीफ ( माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या शुभहस्ते तसेच श्री. अभय मांडरे (प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक तथा अद्योजक पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी श्री हसन मुश्रीफ म्हणाले एम़ .जे. अँग्रोच्या अनेक प्रॉडक्टमुळे शेतीमालाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यानी त्याचा भरपूर उपयोग करून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहून एम् जे अँग्रोने उत्तुंग भरारी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या या प्रॉडक्ट पसंतीने मोठा फायदा होत आहे.
एम जे अँग्रोचे चेअरमन श्री. बाळासाहेब उर्फ धोंडीबा मकानदार तसेच मॅनेजिंग डायरेक्टर श्री . जावेद धोंडीबा मकानदार यांच्या अपार प्रयत्नामुळे एम .जे अँग्रोचे रोपटयाचे वृक्षात रुपांतर झाले आहे. एम.जे. अँग्रोची सर्व उत्पादने सर्वदूर पसरतील यात शंका नाही . अशी भावना त्यानीं यावेळी व्यक्त केली .
यावेळी एमजे अँग्रोचे महाराष्ट्राचे हेड सोनवणे साहेब , राजेन पिसे , अभय मांडरे ,यांचीही भाषणे झाली . या शानदार उदघाटन सोहळ्यास आजरा पंचायत समीतीचे सदस्य बसीर खेडेकर साहेब , गोव्याचे उद्योगपती निजाम लाडजी, पुण्याचे अद्योगपती जयवंत भारमल, मुरगूडचे सुहास खराडे , निवास कदम, मधूकर कुंभार, प्रकाश वंडकर, विष्णूपंत मिसाळ , सा . गहिनीनाथचे पत्रकार शशी दरेकर , प्रदिप वेसणेकर , किशोर पोतदार , सुहास बहिरशेट , सुरेश जाधव यांच्यासह मित्रपरीवार मोठया संख्येने उपस्थित होता. स्वागत सचिन मिसाळ यानी केले तर आभार एम .जे. अँग्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर जावेद मकानदार यानीं मानले.