मुरगूड ( शशी दरेकर ) :
मुंबई येथिल राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषदेतर्फै दिला जाणारा राज्यस्तरीय गुणीजनरत्न जीवनगौरव पुरस्कार ऑनलाईन सोहळ्याव्दारे श्री . अशोक धोंडिबा दरेकर यानां-प्रदान करण्यात आला होता,
शासकीय सेवेत असतानां शाळा , धरणे , बोगदे , कालवे , जलसेतू , पाणी पुरवठा योजना अंतर्गत कामे उत्तमरित्या पूर्ण केलेबद्दल त्यानां राज्यस्तरीय आदर्श अभियंता पुरस्कार , ” मुरगूडी डेज ” या त्यांच्या पुस्तकासही नगर येथिल साहित्य संमेलनात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार त्यानां मिळाला होता. पुलंचे विनोदी लेख स्पर्धामध्येही उल्लेखनिय यश मिळवले होते. आंतरराज्य लेख स्पर्धामध्येही त्यांचा चौथा क्रमांक आला होता.
लता मंगेशकर, आमिताभ बच्चन सह अनेक थोर पुरूषांची व्यक्तिचित्रे रेखाटल्याबद्दल त्यानां कलारत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.
मुंबई येथिल राज्यस्तरीय ” गुणीजन गौरव ” महापरिषदतर्फे पुरस्कार मिळाल्या बदल मुरगूडवाशीयानीं सातारा येथे त्यांच्या घरी भेट घेऊन अशोक दरेकरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतानां अशोक दरेकर म्हणाले मुरगूडवासीयानी साताऱ्यात येऊन माझा यथोचित सत्कार केला त्यामुळे मला निश्चितच प्रेरणा मिळेल. अशी भावना त्यानीं व्यक्त केली, या सत्कार प्रसंगी श्री. संभाजीराव आंगज (सर), दिपक बहुदाणे, बाळासाहेब सुर्यवंशी, भरत येरुडकर (माऊली) यांच्यासह मुरगूडचे नागरीक उपस्थित होते.