केनवडे येथे स्वातंत्र्यदिन उत्सहात
व्हनाळी (सागर लोहार) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी 76 वा भारतीय स्वातंत्र्य दिन केनवडे ता.कागल परिसरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रद्वारे साजरा करण्यात आला. केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या काऱखान्याचे ध्वजारोहन शहिद जवान प्रकाश जाधव (बुद्याळ) यांच्या वीरपत्नी श्रीम.राणी प्रकाश जाधव यांचे हस्ते, चेअरमन मा.आमदार संजयबाबा घाटगे,गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे,सौ.अरूंधती घाटगे यांच्या प्रमुख उपस्थीत करण्यात आले.
यावेळी वीरपत्नी राणी जाधव यांच्या आई सुनिता पाटील, वडिल नामदेव पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक शिवसिंग घाटगे,धनाजी गोधडे,विश्वास दिंडोर्ले तसेच चिफ इंजिनिअर शिवाजी शेवडे, शेती अधिकारी बी.एम.चौगले, चिफ केमिस्ट प्रकाशकुमार माने, हंबिरराव पाटील, सुरक्षा अधिकारी विष्णू पाटील, मॅनेंजर तानाजी कांबळे, सचिव आकाराम बचाटे, प्राचार्य आर.डी.लोहार, एस.एस.चौगले, जे.एन.पाटील, कृष्णात कदम, इंद्रजीत पाटील, विनायक चौगले, शिवराज भरमकर आदी उस्थीत होते.
स्वागत सुभाष पाटील यांनी केले आभार राजेंद्र माळी यांनी मानले.