राजे फौंडेशनमार्फत सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्सला सुरक्षा साहित्य प्रदान

कागल(प्रतिनिधी) : येथे राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनमार्फत करनूरच्या सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्स टीमला सुरक्षा साहित्य प्रदान केले. शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,संचालक यशवंत उर्फ बॉबी माने युवराज पाटील सतीश पाटील यांच्या हस्ते रेस्क्यू फोर्सचे संस्थापक विकास चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहका-यांकडे हे साहित्य प्रदान केले.

Advertisements

गेली चार वर्षे करनूरसह परिसरात आपदग्रस्त परिस्थितीमध्ये या रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून नागरिकांना मदत केली जात आहे. मात्र सुरक्षा साहित्यअभावी या कार्यकर्त्यांची गैरसोय होत होती. याबाबत त्यांनी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्याची दखल घेत हे साहित्य तातडीने पुरवले.यामध्ये तीन लाईफबाॕय रिंग,पाचलाइफ जॅकेट, दोन सर्पकाठी व रोप अशा साहित्याचा समावेश आहे.

Advertisements

यावेळी रेस्क्यू फोर्सचे अनिल ढोले, राहुल कोरे, मिलिंद मोपगार, प्रमोद चौगुले, प्रवीण पाटील, वैभव पाटील, आनंदा पाटील, कृष्णात धनगर,आप्पासो कदम, सुनील गुदले, जयसिंग घाटगे, कुमार पाटील, संभाजी चव्हाण, के बी चव्हाण,जयपाल चौगुले, शरद चौगुले, किरण गुदले,कलाप्पा कोरे, अमोल खोत, संभाजी चव्हाण आदि उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!