कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांनी केला स्वागतपर सत्कार
समरजीत घाटगे यांच्या एकाधिकारशाही व हुकूमशाही पद्धतीला वैतागून सोडला गट
कागल, दि.७: कट्टर समरजीत घाटगे समर्थक असलेल्या भाजपच्या माजी नगरसेविका सौ. दिपाली भुरले व त्यांचे पती संदीप उर्फ बाळासो भुरले यांनी मुश्रीफ गटात प्रवेश केला. कागलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात आमदार हसन मुश्रीफ यांनी स्वागतपर सत्कार केला. यामुळे कागलमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच समरजित घाटगे गटाला मोठे खिंडार पडले आहे. कागल शहरात समरजीत घाटगे गटाला हा मोठा धक्का मानला जातो.
याबाबत अधिक माहिती, भाजपच्या माजी नगरसेविका असलेल्या सौ. दिपाली संदीप उर्फ बाळासो भुरले या कागल नगरपरिषदेतील विरोधी गटनेत्या आहेत. त्यांचे पती संदीप उर्फ बाळासो शिवाजी भुरले हे समरजीत घाटगे यांचे कट्टर व निकटचे कार्यकर्ते होते.
यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, गट-तट, पक्ष -पार्टी न मानता आजपर्यंत केलेली राजकीय वाटचाल व सर्वांगीण विकासामुळे जनता आपल्या सोबत आहे. त्या विश्वासातूनच भुरले दांपत्याने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू. त्यांच्या पाठीशी हिमालयासारखे उभे राहू.
“हुकूमशाहीला वैतागून……”
संदीप उर्फ बाळासो भुरले म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे बहुजनांच्या सर्वांगीण कल्याणाचे काम कौतुकास्पद आहे. समरजीत घाटगे यांची एकाधिकारशाही व हुकूमशाही पद्धतीच्या कामकाजाला वैतागून घाटगे गट सोडून मी मुश्रीफ गटात प्रवेश करीत आहे. यापुढे आमदार श्री. मुश्रीफसाहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्षमपणे कार्यरत राहू.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगरसेवक प्रकाशराव गाडेकर, केडीसीसी संचालक प्रताप उर्फ भैया माने, मनोहर गुरव, पंडित भुरले, सागर गुरव, सागर भुरले, माजी उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, यशवंतराव गुरव, अमित गुटूबाळे, शिवाजी भगले, के. पी. पिष्टे, मुकेश मटूरे, सौरभ पाटील, अर्जुन नाईक, राहुल गाडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
.
……………………..
कागल : येथील समरजीत घाटगे गटाच्या नगरसेविका सौ. दिपाली संदीप उर्फ बाळासो भुरले व संदीप उर्फ बाळासो शिवाजी भुरले यांनी घाटगे गटातून मुश्रीफ गटात प्रवेश केला. आमदार हसन मुश्रीफ यांनी संदीप उर्फ बाळासो भुरले यांचा सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगरसेवक प्रकाशराव गाडेकर, केडीसीसी संचालक प्रताप उर्फ भैया माने, मनोहर गुरव, पंडित भुरले, सागर गुरव, सागर भुरले, माजी उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, यशवंतराव गुरव, अमित गुटूबाळे, शिवाजी भगले, के. पी. पिष्टे, मुकेश मटूरे, सौरभ पाटील, अर्जुन नाईक, राहुल गाडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.