मुरगूड ( शशी दरेकर ) : राधानगरी -हत्ती महाल पासून जवळ असणाऱ्या ” राऊतवाडी ” धबधबा सध्या चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाला असून या धबधब्याकडे आजुबाजूच्या हिरवाईचे निसर्गसौदर्यासह नेत्रसुखद आनंद घेत पावसाळी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.
राऊतवाडी धबधब्यासह काही ठिकाणी , परिसरात लहान -मोठे धबधब्याचे आकर्षण आता सर्वांनाच वाटू लागले आहे .
राऊतवाडी धबधब्याजवळ भाजलेली कणसे , व इतर खाऊ पदार्थांची दुकाने पर्यटकांच्या जिभेची चोचले पुरवण्यासाठी सज्ज आहेत. राऊतवाडी धबधब्याचे नेत्रसुखद आनंद घेण्यासाठी व निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी पर्यटकानां नक्कीच साद घालत आहे .