कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन – साके ग्रामपंचायतीचा उपक्रम
व्हनाळी – सागर लोहार : आनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र राज्य व व्हीजनस्प्रिंग दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन कागल तालुका, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने साके ता.कागल येथे विठ्ठल मंदिरात मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले. तपासणी शिबीराचा शुभारंभ डिस्ट्रीक्ट रिपोटर्स चे तालुका अध्यक्ष पत्रकार सागर लोहार,उपसरपंच रविंद्र जाधव ,सदस्य सौ.रंजना तुरंबे, निलेश निऊंगरे , तालुका संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब तुरंबे, सी.बी.कांबळे, यांचे हस्ते करण्यात आला.
शिबिरामध्ये ३७० लोकांची डोळे तपासण्या करण्यात आल्या व त्यातील २२३ नागरिकांना संस्थेच्या माध्यमातून अवघ्या साठ रुपयात त्याच दिवशी चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी अनंतशांती व डिस्ट्रीक्ट रिपोटर्स पत्रकार संस्थेमार्फत असे विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असल्याचे अध्यक्षा माधुरी खोत व संस्थापक भगवान गुरव,पत्रकार सागर लोहार यांनी सांगितले. या शिबिरासाठी डॉ. शीतल शिरसाट, श्री.गणेश चिकणे, श्री.गोपाळ पानभरे ,श्री.प्रशांत भुसारी, पत्रकार जे.के.गोरंबेकर,रमेश पाटील,प्रकाश कारंडे,तानाजी पाटील, यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमास सी.बी.कांबळे, मारूती निऊंगरे,दगडू पोवार,राजू शेंडे,सागर पाटील, बापूसो पाटील,शहाजी पाटील,सुरेश आगळे,युवराज पाटील,मोहन गिरी,शशिकांत पाटील,मारूती पाटील,तेजस्विनी पाटील तसेच उत्कर्ष महिला बचत गटाच्या महिला उपस्थीत होत्या.