वंदूर ग्रामपंचायतीकडून गणेश मूर्ती व निर्माल्य दान उपक्रम

वंदूर (महेश कांबळे) : पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी वंदूर(ता. कागल) ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश मूर्ती व निर्माल्य दान उपक्रम राबवण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने कृत्रिम कुंड तयार करून यामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या, सुमारे १५० हून अधिक गणेश मुर्ती व निर्माल्य यावेळी दान करण्यात आले.

Advertisements

या उपक्रमासाठी सरपंच सविता हिरेमठ, बबन खोडवे, सागर बागणे, ग्रामविकास अधिकारी एम. के. कांबळे, शिवाजी माळकर, मोहन कांबळे, उत्तम कांबळे शशिकांत खोडवे यांचे सहकार्य लाभले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!