व्हनाळी येथे शाहू आघाडीचे नुतन संचालक घाटगेंच्या भेटीला
व्हनाळी(सागर लोहार): माजी आमदार संजयबाबा घाटगे व जि. प. चे माजी शिक्षण सभापती अंबरिषसिंह घाटगे यांची शिक्षण आणि शिक्षकाबद्दल असणारी असता व शिक्षकांना दिलेले भक्कम पाठबळ यामुळेच प्राथमिक शिक्षक बॅंकेध्ये परिवर्तन घडू शकले असे प्रतिपादन सर पिराजीराव शिक्षक पतपेढी कागलचे मा.चेअरमन व शिक्षक नेते मुख्य़ाध्य़ापक आयलु देसा यांनी केले.
व्हनाळी ता.कागल येथे प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या नुतन संचालकांच्या भेटी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजश्री शाहू शिक्षक आघाडी चे नुतन संचालक बाळासाहेब निंबाळकर यांचे हस्ते सर्व शिक्षकांच्या उपस्थीत माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.
देसा पुढे म्हणाले, शिक्षणात राजकारण न आणता अंबरिषसिंह घाटगे यांनी शिक्षण सभापती असताना जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा डिजीटल केल्या तसेच सर्व शिक्षकांच्या सोयीच्या बदलीसाठी शिक्षकांना पाठबळ दिले. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी गेल्या 35 वर्षामध्ये शैक्षणिक दर्जा उचावण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना नेहमीच साथ दिली. म्हणूनच त्यांच्या शब्दाचा जिल्हातील सर्व शिक्षक मान ठेवतात असे त्यांनी सांगीतले.
संजयबाबा घाटगे म्हणाले, ज्या शिक्षक मंडळींनी माझ्या शब्दाचा मान ठेवून आपला उमेदवारंनी अर्ज माघार घेतला आणि बाळासाहेब निंबाळकरांच्या विजयाला साथ देवून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला त्या सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त केले.
यावेळी सुनिल पाटील, के.डी.पाटील, मोहन पाटील, तुकाराम मोहिते, शंकर नलवडे, प्रकाश मगदूम, एम. आर. गुरव, बाळासाहेब तांबेकर आदी शिक्षक उपस्थीत होते. स्वागत सुरेश सोनगेकर यांनी केले आभार रमेश जाधव यांनी मानले.