कागल/ विक्रांत कोरे : कागलसह परिसरात आज दिवसभर पावसाने झोडपले. नदी- नाल्यांना पाणीच-पाणी आले .पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वतःच्या पावसाने शेतमजुरांच्या कामाचे वेळापत्रक ठप्प झाले. गेल्या 40 दिवसापासून पावसाळ्याला सुरुवात झाली .मात्र म्हणावा तितका जोरदिसत नव्हता.
पावसाळ्याच्या सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा चिंतेत होता.तर काही शेतकरी मंडळींनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोयाबीन भुईमूग हायब्रीड मक्का पेरणी करून घेतली.
सोमवारी दिवसभर पावसाने झोपून काढले नद्या नाल्यांना पाणीच पाणी आले सततच्या पावसाने शेतमजुरांचे मात्र नुकसान झाले त्यांना फटका बसला.
सोमवार कागल चा बाजार होता. भाजीपाला विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळे फळभाजी व भाजीपाला विक्रेत्यांच्यावर पावसाचे पाणी फिरले. त्यांना कमी दराने विक्री करावी लागली. घेणाऱ्यांची मात्र चंगळ होती.
कागल शहरानजिक असलेल्या आरटीओ ऑफिस जवळच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता वाहतुकीस बंद करावा लागला .तसेच पंचायत समीती समोरच्या बोगद्यात पाणी साचले होते. रस्त्यात ठिकठिकाणीच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बालचमुनीखेळण्याचा आनंद घेतला.