बातमी

मुरगूडच्या काव्यसंम्मेलनात कवितांच्या वर्षावात काव्यरसिक चिंब

मुरगूड(शशी दरेकर) : संसार, ‘पाऊस, वाकळं, कोरोना, जीवन, शिवार,आई, भूक, महागाई, शेतकरी यासारख्या विविध विषयांवरील कवितांचे सादरीकरण करुन कवींनी काव्यसंम्मेलनात रंगत भरली.

येथील लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑफ सोसायटी लि. सोलापूर च्या मुरगूड शाखेतर्फे हे काव्य संम्मेलन जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आले होते.जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिल्पकार एम.डी.रावण होते.बिद्रीचे संचालक दत्तामामा खराडे,जेष्ठ साहित्यिक डॉ.एम.जी.गुरव,दलितमित्र मधुकर सामंत,सल्लागार सदस्य बाळासाहेब सुर्यवंशी,प्रकाश तिराळे,रामचंद्र सातवेकर आदी प्रमुख उपस्थीत होते.

कवी शशी दरेकर, ( मुरगूड ) यांच्या
” संसाररुपी जीवनात” या त्यांच्या कविताने ” काव्यरसिकानी टाळ्यांच्या गजरात दाद दिली , पी.एस.कांबळे (आकुर्डे) कृष्णा कांबळे (भडगाव), एस.पी. कांबळे, डी. एच. पाटील (म्हाकवे)काँ.संतराम पाटील (केनवडे),सिकंदर जमादार, एम.जी.गुरव,जयवंत हायळ, मोहन गोखले, धोंडीराम परीट ( शिवभक्त ), विनायक हावळआदींसह २० कवींनी आपल्या हास्य,बाल,व प्रेम कविता सादर करून श्रोत्यांची वाह वाह मिळवली. यामध्ये प्रामुख्याने पाऊस, वाकळं, कोरोना, शिवार, आई, भूक, महागाई, विधवा, झोपडी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण, नदी, बहिष्कृत, संसार, वारी या विषयावरील कवितांचा समावेश होता. स्वागत प्रास्ताविक विनायक हावळ यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते कवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी एम.डी.रावण म्हणाले,कवी कालिदास हे महान कवी होऊन गेले. त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेले कवी सामाजिक प्रबोधनाचा वारसा जपत आहेत.

नव नवी कविता जन्माला याव्यात यासाठी व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे.प्रा.हिंदूराव तिराळे,स्मिता बुडके यांचीही भाषणे झाली. कवी सम्मेलनातील सर्व सहभागी कवींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी साधना चौगुले, सत्यजित जाधव,निरंजन तिराळे, चैत्राली कुंभार, सानिका मगदूम, पुनम कोंडेकर, स्मिता बुडके, स्वराजंली मोरबाळे व सानिका पाटील या दहावी, बारावी परिक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

प्रसंगी माजी शिक्षणाधिकारी पी. आर. पाटील, रंगराव चौगले, नवनाथ डवरी, सुनील खराडे, आकाश कांबळे, तानाजी कोथळकर, शशिकांत जाधव, अनिल पावले आदी उपस्थीत होते. सुत्रसंचालन एस.के.पाटील यांनी केले. आभार मँनेंजर ए. बी.पोवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *