व्हनाळी(सागर लोहार) : दलितांचे कैवारी ,बहुजनांचे उध्दारक आणि समतेचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 147 वी जयंती कागल तालुक्यात अन्नपुर्णा शुगर कारखाना, विविध संस्था,तरूण मंडळे, संघटना, शाळा, महाविद्यलये, ग्रामपंचायत विविध ठिकाणी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
श्री अन्नपुर्णा सहकारी पाणी पुरवठा संस्था, कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआय, समृद्धी दुध प्रकल्प यांच्या वतीने श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लि.केनवडे ता.कागल येथील कारखाना कार्यस्थळावर लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली. यावेळी शाहू महारांच्या प्रतिमेचे पुजन चेअरमन मा.आमदार संजयबाबा घाटगे यांचे हस्ते गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे, चिफ केमिस्ट प्रकाशकुमार माने, चिफ इंजिनिअर शिवाजीराव शिवडे, एच.एस.पाटील, बी.म.चौगले, एस.एस.चौगले, विष्णू पाटील यांच्या उपस्थीत करण्यात आले.
यावेळी संजयबाबा घाटगे यांनी शाहू महारांजानी दिनदलित उपेक्षित समाजासाठी केलेल्या समाजिक कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त करून शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले. दतात्रय पाटील,सचिन गाडेकर,आनंदा पाटील, एन.एस.पाटील, कृष्णात कदम,प्राचार्य आर.डी.लोहार,जे.एन. पाटील,आकाराम बचाटे, विनायक चौगले,तानाजी कांबळे,आदी उपस्थीत होते.
साके ता.कागल येथे सुभद्रामाता हायस्कुल,विद्या मंदिर प्राथमिक शाळा, शेतकरीराजा सहकारी दुध संस्थेच्यावतीने लोकराजा शाहू जंयती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. छत्रपती शांहूच्या प्रतिमेचे पुजन डॅा.हिंदूराव पाटील,साताप्पा पाटील यांचे हस्ते चेअरमन शहाजी पाटील,व्हा.चेअरमन रावसाहेब चौगले,सचिव बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थीत करण्यात आले.
श्री राम दुध संस्थेमध्ये शाहूंच्या प्रतिमेचे पुजन शामराव शेंडे यांचे हस्ते करण्यात आले. बाजीराव पाटील, सुभाष शेंडे, सुनिल पाटील, शहाजी शेंडे, सुरेश पाटील, बाजीराव शेंडे, शहाजी शेंडे, डि.एम.मागले, विश्वास पाटील, तुकाराम पाटील,समीर पाटील, सुनिल घराळ, शरद पाटील, राजाराम पाटील, शंकर पाटील, तानाजी निऊंगरे, मच्छिंद्र पाटील, वसंत पाटील, संतराम पाटील, अनिल पाटील आदी उपस्थीत होते.