कागल/ प्रतिनिधी : लोकनेते राज्याचे मंत्री हसन मुश्रीफसो यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात चार महामानवांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या पुतळ्यांचा ऐतिहासिक अनावरण समारंभ शनिवारी तारीख 4 जून रोजी सायंकाळी चार वाजता होत आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व श्री शाहू उद्यानातील महात्मा श्री बसवेश्वर यांचे भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत. त्याचा अनावरण समारंभ राज्याचे उपमुख्य मंत्री नामदार अजित दादा पवार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुप्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे .तसेच येथील नवीन आरटीओ चेक पोस्ट कागल –निपाणी हायवे च्या पूर्व बाजूस, शहरालगत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागलचे भूमिपुत्र आणि राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री सतेज पाटील ,राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय दादा मंडलिक ,खासदार धैर्यशील माने ,माजी आमदार संजय बाबा घाटगे ,आमदार पी एन पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे ,आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजू आवळे ,आमदार जयवंत तासगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव ,यांच्यासह प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत.
या समारंभाची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. सुमारे पन्नास हजारांहून अधिक लोक उपस्थित राहतील असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे .पावसाळ्याचे दिवस आहेत तरी सुरक्षित मंडपाची बांधणी करण्यात आली आहे. जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने ,नवीद मुश्रीफ, शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संजय चितारी, नितीन दिंडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनुले, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, सुनील माळी, अजित कांबळे, अमर सणगर, इरफान मुजावर, सुरेश शिंदे, सौरभ पाटील, रमेश तोडकर आदी मान्यवरांनी कार्यक्रम स्थळाचे पाहणी करून नेटके नियोजन केलेआहे.