कोल्हापूर, दि. 29 : शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांची विचारांनी नेहमीच प्रेरणा दिली. लोकराजा शाहुंचे प्रेरणादायी विचार अधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्रात जनजागरण यात्रा होणार असल्याची माहिती गृहनिर्माण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. निर्मिती विचारमंच, कोल्हापूर आयोजित राजर्षी शाहू स्मृती शताब्दीनिमित्त राजर्षी शाहू विचार संमेलन दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. या संमेलनास स्वागताध्यक्ष माजी आमदार राजू आवळे, आदिल फरास, विजय चोरमारे, डॉ. कपिल राजहंस, अनिल म्हमाने, डॉ. शोभा चाळके-म्हमाने आदी उपस्थित होते.
आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी, शाहू व फुले-आंबेडकर यांच्या विचारापासून प्रेरणा घ्यावी
गृहनिर्माण मंत्री आव्हाड पुढे म्हणाले की, कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणा व विचारांनी जगणारी माणसं आहेत. लोकराजा शाहूच्या विचारांना उजाळा देत त्यांनी राबविलेल्या शिक्षणासाठी सुविधा, समाजातील सर्व घटकांतील मुला-मुलींसाठी निवासी वसतीगृह, खेळातील आवड व योगदानाबाबत त्यांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांना मानवंदना दिली. सर्वांनी समतेचा विचार जोपासावी तसेच छत्रपती शिवाजी, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा आजच्या युवकांनी घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले.
विधवा प्रथेचे उच्चाटन करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक असून शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथेबाबत जो सकारात्मक उपक्रम राबविला तोच उपक्रम राज्यातील इतर ग्रामपंचायतीने राबवून विधवा प्रथेचे समूळ उच्चाटन करून विधवा महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना इतर सर्वसामान्य स्त्रिया प्रमाणे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही श्री. आव्हाड यांनी केले.
राजर्षी शाहू विचार संमेलनाचे उद्घाटक ना. जितेंद्र आव्हाड यांनी भारतीलय संविधानाची प्रास्ताविका वाचून दाखविली. श्री. आव्हाड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजर्षी जीवन गौरव पुरस्कार 2022 हा पुरस्कार यावेळी डॉ. श्रीपाद देसाई, इंद्रजित सावंत, भरत लाटकर, स्मिता गिरी, अनंत हावळ, यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘भीमाची लेकरं’ या ओंकार सुतार लिखित व निर्मित गाण्याचं पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. डॉ. कपिल राजहंस संपादित सर्वव्यापी शिवराय या ग्रंथाचा प्रकाशनवेळी विद्याधन कांबळे, रशीद मोमीनचाचा, समीर मोमीन यांचाही सन्मानचिन्ह सत्कार करण्यात आला. या संमेलानाचे स्वागताध्यक्ष राजू आवळे म्हणाले की, राजर्षी शाहू विचार संमेलनाने लोकराजा शाहू महाराजांच्या कार्याचा, समतेच्या विचारांचा जागर लोकांपर्यत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात निर्मिती फिल्म क्लब निर्मित सलाम संविधान या प्रबोधनपर संगीतमय कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
Wow, wonderful blog layout! How long have you ever been running a blog for?
you make blogging glance easy. The full look of your web site is great, as neatly as the content!
You can see similar here sklep internetowy