केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०२२ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
UPSC CDS Recruitment 2022
भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा,
भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला मध्ये २२ जागा,
हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ जागा,
ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई मध्ये १६९ जागा
ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई मध्ये १६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह) उत्तीर्ण असावा.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता परीक्षा फीस २००/- रुपये आहे, तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जून २०२२ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.