सिध्दनेर्ली (वार्ताहर) : “स्नेहमेळाव्यातून आपल्या आरोग्याबरोबर माहिती आदान प्रदानाचे महत्वाचे कार्य पार पडते. वेळ प्रसंगी मित्रासारखा दुसरा आधार नसतो” असे उद्गार शिवाजीराव चाैगले यांनी व्यक्त केले. ते गारगोटी येथील कर्मवीर हिरे महाविद्यालयातून सन १९८८-८९ साली बी.ए.बी.एड्.(स्पे.) ही पदवी घेऊन बाहेर पडलेल्या वर्ग बंधू भगिनींचा स्नेह मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. हा स्नेह मेळावा एकोंडी ता. कागल येथे १३ मे रोजी पार पडला.
या वर्गात शिकलेले व सद्या श्री. नागनाथ विद्यालय, एकोंडी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले या गावचे वर्गमित्र शिवाजीराव चाैगले हे या स्नेह मेळाव्याचे प्रायोजक होते. या वर्ग बंधू भगिनींचा हा आठवा स्नेह मेळावा होता. या वर्गाच्या स्नेह मेळावा दर वर्षी १३ मे रोजी आयोजित केला जातो. यावेळी या बॅचमधील पुरस्कार व पदोन्नतीप्राप्त शिक्षक वर्गबंधू भगिनींचा शिल्ड,फेटा व आंब्याचे रोप देऊन गाैरव करण्यात आला.
यावेळी ह.भ.प.हिंदूराव भोईटे ,विलास शेणवी व गोपाल कांबळे या वर्गमित्रांनी मनोगते व्यक्त केली. मेळाव्यास गारगोटी मुंबई, पुणे, चंदगड, जयसिंगपूर, गडहिंग्लज, पन्हाळा, चिपळूण येथून सुमारे पन्नास वर्ग बंधू भगिनी उपस्थित होते. प्रास्ताविक स्नेह मेळावा समितीचे निमंत्रक प्रा.डाॅ.आनंद वारके यांनी केले.आभार सचिव आर.वाय.देसाई यांनी मानले.
मेळावा पार पाडण्यासाठी शिवाजीराव चाैगले (एकोंडी)प्रा.डाॅ.आनंद वारके (बिद्री), आर.वाय.देसाई (गारगोटी),किसन शेट्टी (नवरसवाडी) बाबासाहेब माने (आकीवाट)व डाॅ.रजनीकांत पोवार (पंडेवाडी) यांनी प्रयत्न केले. आजवर या बॅचचे गारगोटी,बांधा, दुर्गमानवाड,कापशी या ठिकाणी मेळावे संपन्न झाले आहेत.