मुरगूड ( शशी दरेकर ) : राजकारणातील एकमेकाचे वैर विसरून कुस्तीसाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे पैलवान घडवण्याचा आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पद्के मुरगूडात आणण्याचा या स्नेह मेळाव्यात निर्धार करण्यात आला*
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वस्ताद आनंदा गोधडे तर प्रमूख पाहुणे राष्ट्रकूल कुस्ती स्पर्धेतील विजेते आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान राम सारंग होते.
सुरुवातीला दिवंगत मल्लांना श्रध्दांजली वाहण्यात आली. स्वागत राजू चव्हाण तर प्रास्ताविक दगडू शेणवी यांनी केले. माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, आनंदा लोखंडे, पांडुरंग पुजारी, संपत कोळी, अनिल राऊत, अॅड. खाशाबा भोसले, पृथ्वीराज कदम, प्रा.रविंद्र शिंदे, नामदेव भांदीगरे, जगन्नाथ पुजारी, तानाजी डेळेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी पैलवान राम सारंग म्हणाले, आता कुस्ती हा रांगडा खेळ उरला नसून त्याच्यात नवनविन तंत्रे आली आहेत. आज तालमींची संख्या घटू लागली आहे. जुन्या काळातील वस्ताद आणि मल्लानी ती नव्याने जनतेत रुजवायला हवी. यासाठी कुस्तीचे शिक्षण, खुराक आणि वेळ महत्त्वाचे आहे. परदेशातील खेळांमधील सरकारचे योगदान तसेच पाश्चिमात्य जगातील खेळाचा होत असलेला विकास याबाबतही त्यांनी मनोगत मांडले.
माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट, लक्ष्मण मेंडके, श्रीकांत चौगुले, सदाशिव भारमल, निवृत्ती रावण, बाळासो पुजारी, मीरासो बेपारी, बजरंग सोनुले, महादेव हाळदकर, जोतीराम जाधव, मारुती रावण, धोंडिराम माडेकर आदी जूने पैलवान उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पैलवानांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
संयोजक पै.आनदा मांगले पै.युवराज सुर्यवंशी, दत्तात्रय मंडलिक, सुनिल शेलार, पप्पु चौगले, सुरेश शिंदे, संतोष गुजर, गणेश तोडकर, युवराज भोसले, विकास निकम,राजू मुजावर, सचिन मगदुम, सुरेश भिके, अमर चौगले, बाळासो हासबे, उदय चौगुले, नगरसेवक राहुल वंडकर, रघुनाथ चौगुले, शिवाजी मोरबाळे, अमर उपलाने बाजीराव उपलाने, पांडुरंग चव्हाण, जोतिराम बरकाळे, सुहास डेळेकर, संजय चव्हाण, संदिप चव्हाण, अंकुश मांगले, प्रविण मांगोरे, सुशांत महाजन, पांडुरंग कापसे, सोमनाथ पानारी, अमोल रणवरे, सातापा डेळेकर आदी पैलवान उपस्थित होते. सुत्र संचालन सुशांत मांगोरे यांनी केले. तर आभार अमित तोरशे यानीं मानले.