मुरगूड ( शशी दरेकर ) : पैलवान पृथ्वीराज पाटील हा महाराष्ट्र केसरी चा मानकरी ठरल्याबद्दल मुरगूड ता. कागल येथे पैलवान मित्रमंडळींनी फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
महाराष्ट्र केसरी पैलवान विनोद चौगुले यांच्यानंतर तब्बल बावीस वर्षांनी महाराष्ट्र केसरी पदाचा मान कोल्हापूरला मिळाला तो पैलवान पृथ्वीराज पाटील यांच्या माध्यमातून त्यामुळे मुरगुड मधील पैलवान मित्रमंडळींना आनंद झाला येथील लाल आखाडा व्यायाम मंडळ विश्वनाथराव पाटील कला क्रीडा व्यायाम मंडळ, जय शिवराय तालीम मंडळ, राणा आखाडा, साई आखाडा येथील पैलवान बसस्थानक परीसरात एकत्र येऊन एकच जल्लोष केला.
यावेळी साखर पेढे वाटुन आपला आनंद व्यक्त केला. यावेळी पै. जगन्नाथ पूजारी, आनंदा लोखंडे, पै.दगडू शेणवी,पृथ्वी कदम यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी वस्ताद आनंदा गोधडे, पै.आनंदा मांगले, युवराज सुर्यवंशी, राजु चव्हाण, पांडुरंग पुजारी, अमित तोरसे, विनोद चौगले, सुशांत मांगोरे, सुनिल शेलार, बाजीराव उपलाने, प्रविण मांगोरे, शिवाजी मोरबाळे,अकुश मांगले, निशांत जाधव, संपत कोळी, स्वप्नील इंदलकर, रघू चौगले, संतोष गुजर, गणेश तोडकर, सुरेश शिंदे,सुरज आरागडे ही पैलवान मंडळी नागरिक उपस्थित होते.