कोल्हापूरच्या इसमाचा कागलमध्ये मृत्यू

कागल / प्रतिनिधी : आजारपणामुळे त्रस्त असलेल्या इसमाचा कागल बस स्थानका नजीक मृत्यू झाला. तारीख 26 नोव्हेंबर 26 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Advertisements

       गजानन अर्जुन सुतार,वय -वर्षे 46, राहणार- साळुंखे पार्क, भारत नगर कोल्हापूर असे मयत इसमाचे नाव आहे. कागल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Advertisements

       कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मयत गजानन सुतार हे धुरधर आजाराने त्रस्त होते. कोल्हापूर येथील सीपीआर रुमालयातून उपचार घेऊन येते असे सांगून ते घरातून बाहेर पडले. इतरत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.

आज तारीख 26 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कागल बस स्थानका- समोरील एकाऔषध दुकानासमोर गजानन सुतार हे बेशुद्ध अवस्थेत मिळाले. त्यांना कागलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नले होते. परंतु उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे सांगण्यात आले.

 कागल पोलीस ठाण्याचे हवलदार श्री. ठोंबरे हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!