बहुचर्चित मराठी चित्रपट ‘प्रेम’ चित्रपट जानेवारी २७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील ६० कलाकारांचा सहभाग

Advertisements

रंगराव बन्ने (बारवाड):-
ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बी.बी.सी. फिल्म प्रोडकशन, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्मितीत साकारत असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘प्रेम’चे चित्रीकरण नुकतेच शिर्डी आणि परिसरातील सुमारे ३५ किलोमीटरच्या भागात मोठया उत्साहात संपन्न झाले असून हा चित्रपट जानेवारी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती या चित्रपटाचे लेखक व निर्माते सुदाम संसारे यांनी दिली.
    

Advertisements

या चित्रपटामध्ये महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील ६० कलाकारांनी सहभाग घेतला असून आपल्या अभिनयकौशल्याची झलक दाखविली आहे. सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, विनोदी तसेच महाविद्यालयीन जीवनातील विविध घडामोडींवर आधारित असलेला हा चित्रपट मनोरंजनासोबतच सामाजिक आशय मांडणारा असा आहे.


   चित्रपटांचे लेखन आणि निर्मितींची जबाबदारी सुदाम संसारे यांनी सांभाळली आहे, तर कार्यकारी निर्माता म्हणून शहाजहान तांबोळी यांनी काम पाहिले आहे. दिग्दर्शनाची धुरा अशोक कपूर यांनी सांभाळली असून, सहदिग्दर्शक म्हणून भूषण सरदार यांनी त्यांना साथ दिली आहे. कॅमेरामन प्रफुल्ल सर यांनी चित्रीकरणासाठी आपले कौशल्य पणाला लावले आहे.


    या चित्रपटात सुदाम संसारे (लेखक, निर्माता व कलाकार म्हणून तर संजय मोरे (सहनिर्माता), भूषण सरदार (सहदिग्दर्शक) यांनी काम पाहिले आहे.तर प्रियांका बागुल, संगीता शिंदे, विद्या ठाकूर, भक्ती साधु, कुसुम बेलसरे, सुनंदा सूर्यवंशी, रामभाऊ गवई, आदित्य वानखडे, गिरीश आवारे, आदित्य खानझोडे, अरूण शेलार, संभाजी खेरे, वजीर शेख, अमित पाटील, धर्मराज अलगट, मुकुंद आव्हाड, शंकरराव कन्हेरकर, बळीराम पा. चौधरी, मयूर शिंदे, अरूण कांबळे,पत्रकार रंगराव बन्ने,रोहिणी बागडे,पत्रकार वजीर शेख यांच्यासह अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.


‘माहेरची साडी’ची आठवण करून देणार ‘प्रेम’ !
‘प्रेम’ हा चित्रपट प्रेक्षकांना लोकप्रिय असा ठरणार असून ‘माहेरची साडी’ची आठवण करून देईल, असा विश्वास निर्मिती टीमकडून व्यक्त करण्यांत आला आहे. चित्रपटात एकूण चार गाणी असून, कथा सामाजिक आणि कौटुंबिक भावविश्वासोबत राजकीय घडामोडी, विनोद आणि महाविद्यालयीन जीवनातील अनुभव यांची सांगड घालणारी आहे. त्यामुळे विविध वयोगटांतील प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली असून शिर्डी आणि परिसरातील विविध ठिकाणी चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर आता चित्रपटाच्या पुढील प्रक्रियेला गती मिळाली आहे. जानेवारी २०२७ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार असल्याने कलाकार, निर्मिती टीम आणि चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. ‘प्रेम’च्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक, कौटुंबिक आणि मनोरंजनात्मक आशयांची वेगळी मांडणी अनुभवायला मिळणार आहे.


फोटो : प्रेम या मराठी चित्रपटाचे पोस्टर

Leave a Comment

error: Content is protected !!