पहिली कुस्ती बरोबरीत; दुसऱ्या कुस्तीत प्रसाद सासणे ची बाजी

व्हन्नूर : भैरवनाथ नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात नामवंत पैलवानांच्या चित्तथरारक कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांची मने जिंकली. मैदानात झालेल्या अटीतटीच्या लढतींमुळे कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Advertisements

मैदानातील पहिल्या क्रमांकाची कुस्ती हिंदू गर्जन केसरी, शिवरामदादा तालीम, पुणे येथील पैलवान शुभम सिद्धनाळे आणि गणेश कुंकले शाहूपुरी तालीम यांच्यात झाली. दोन्ही पैलवानांनी उत्कृष्ट डावपेच दाखवत जोरदार लढत दिली. अखेर ही कुस्ती बरोबरीत सुटली. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत इचलकरंजीच्या प्रसाद सासणे याने शुभम देशमुख याच्यावर गुणांच्या आधारे विजय मिळवला.

Advertisements

तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत गोरंबे येथील पैलवान विनायक वासकर याने गंगावेश तालमीच्या मनोज पुजारी याच्यावर विजय मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले. याशिवाय पैलवान समर्थ खाडे, हर्षवर्धन बोराटे, ओंकार जाधव आणि साईराज बोराटे यांनीही विजय मिळवला.

मैदानात झालेल्या विविध कुस्त्यांमुळे उपस्थित कुस्तीशौकिनांना दर्जेदार कुस्त्यांची मेजवानी अनुभवायला मिळाली. या कुस्ती मैदानासाठी राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान राम सारंग यांनी मार्गदर्शन केले.कुस्तीचे निवेदन सर्जेराव मोरे यांनी केले.

कुस्ती मैदानात पंच म्हणून आप्पा निकम, सचिन खोत, संभाजी मगदूम, शंकर मेडशिंगे, प्रवीण निकम, दत्ता बोराटे, राजू निकम, मेजर दत्ता बोराटे,शुभम कांबळे, पृथ्वीराज निकम आणि आकाश पाटील यांनी काम पाहिले.

भैरवनाथ नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या कुस्ती मैदानामुळे पारंपरिक कुस्ती संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले. कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत आणि उत्साही वातावरणात मैदान उत्साहात पार पडले.

Leave a Comment

error: Content is protected !!