कागल (प्रतिनिधी) : शेतात शाळूत टाकणीस गेलेल्या तरुनाचा अंगावर विज पडून तो मयत झाला़.ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्या पूर्वी घडली. रणजीत सिद्राम पाटील,राहणार -म्हाकवे (तालुका -कागल वय वर्ष 30 )असे मयत तरुणाचे नाव आहे.
Advertisements
कागल पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवार तारीख 17 रोजी सायंकाळच्या दरम्यान शेतात शाळूची पेरणी करण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याच्या अंगावर वीज कोसळली. उपचारासाठी त्याला कागल ग्रामीण रुग्णालयात नेले होते. तेथील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. कागल पोलीस ठाण्याचे हवलदार गुरव हे पुढील तपास करीत आहेत.
Advertisements
