मुरगूड (शशी दरेकर) : कन्या विद्या मंदिर, मुरगूड येथे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरीमध्ये नव्याने दाखल झालेल्या कु.अन्वी नितीश बागडी हिचा ३ सप्टेंबर रोजी वाढदिवसाचा होणारा वायफळ खर्च न करता मुलाना खेळण्यासाठी प्रोत्साहन देऊन युनिफॉर्म भेट देण्यात आले.
या वाढदिवसानिमित्त श्री. नितीश बागडी सर व सौ. पूजा बागडी मॅडम यांनी सामाजिक बांधिलकी जपत कन्या विद्या मंदिर, मुरगूड येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींसाठी तब्बल ₹३५ हजार रुपये किमतीचे स्पोर्ट्स युनिफॉर्म भेट दिले.

विद्यार्थिनींच्या शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे कौतूक शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष आकाश दरेकर यांनी केले ते म्हणाले खरोखर मुलं सशक्त होण्यासाठी मुलांना बुद्धिमत्ते प्रमाणात शारीरिक व खेळाची गरज आहे त्यामुळे मुले सुदृढ होतात.
या उपक्रमाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,पालकांकडून कौतुक करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल कन्या विद्या मंदिर, मुरगूड यांच्या वतीने बागडी कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. विद्यार्थिनींसाठी केलेल्या या दातृत्वपूर्ण योगदानाबद्दल “आपल्या दातृत्वास आमच्या वतीने सलाम!” अशा शब्दांत कृतज्ञता मुख्याध्यापिका यांनी व्यक्त केली.