कागल (प्रतिनिधी): कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीटेकडीजवळ असलेल्या हाय व्होल्टेज ट्रान्समिशन टॉवरवर एका अज्ञात महिलेने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज, २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:०० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष गंगाराम तेली यांनी दिलेल्या वर्दीवरून कागल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (रजि. नं. ७७/२०२६, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे) करण्यात आली आहे.


पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार शिंदे हे नोंदणी अंमलदार म्हणून काम पाहत आहेत. मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.