व्हन्नूरमध्ये निर्माल्यदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामस्थांकडून १०० टक्के निर्माल्यदान; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श

व्हन्नूर : जलप्रदूषणाला आळा घालण्याबरोबरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत, व्हन्नूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या निर्माल्यदान उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Advertisements

ग्रामस्थांनी जलप्रदूषणाचे गांभीर्य ओळखून गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य नदी, ओढे किंवा जलस्रोतांमध्ये न टाकता १०० टक्के निर्माल्यदान करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला.

Advertisements

        गावातील गणेश विसर्जनाच्या विविध ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी ट्रॅक्टर तसेच ग्रामपंचायतीची घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना निर्माल्यदान करणे सुलभ झाले. या उपक्रमामुळे जलस्रोतांमध्ये होणारे प्रदूषण रोखण्यास मदत झाली.

         निर्माल्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती केली जात असल्याने या उपक्रमाला पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धार्मिक भावना जपत पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थांसह परिसरातून कौतुक होत आहे.

Advertisements

       या वेळी ग्रामपंचायतीचे लिपिक भगवान निकम, ग्रामसेवक बशीर मुजावर, चंद्रकांत यादव, तसेच उपक्रमाचे विभागप्रमुख एन. सी. यादव उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधून पर्व पाटील,संग्राम जाधव,श्रेयस खाडे,विश्वजित पाटील यांनीही निर्माल्य संकलन उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

        “धार्मिक श्रद्धेसोबत पर्यावरणाचीही काळजी” हा संदेश देणाऱ्या व्हन्नूरच्या या उपक्रमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची प्रेरणादायी वाटचाल अधोरेखित केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!