मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील शहर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने संघाच्या विरंगुळा केंद्रामध्ये सुमारे ४० शिक्षकांचा यथोचित सत्कार शिक्षक दिनानिमित्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य पी डी मगदूम होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, सचिव सखाराम सावर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बोलतांना प्रमुख मार्गदर्शक किशोरकुमार पाटील म्हणाले, शिक्षक म्हणजे देशाची भावी पिढी घडवणारे शिल्पकार आहेत. राष्ट्रबांधणी मध्ये शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते याची समाजानेही जाण ठेवावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पी डी मगदूम म्हणाले, समाजाच्या जडणघडणी मध्ये शिक्षकांचे खुप मोठे योगदान असून शिक्षकांचा सन्मान हा त्या देशाचा सन्मान असतो. या प्रसंगी प्रा.पी एस सारंग यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रा.रविंद्र शिंदे,वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी,प्राचार्य व्ही बी खंदारे,एस एम कुडाळकर,एम आर पाटील,प्रा. महादेव कोळी, ए. एम. पाटील आदि शिक्षक बांधवांचे शिक्षकदिना निमित्य यथोचित सत्कार करण्यात आले.
स्वागत अशोक डवरी यांनी, प्रास्ताविक महादेव कानकेकर यांनी,सुत्रसंचालन जयवंत हावळ यांनी तर आभार एम टी सामंत यांनी मानले.
या कार्यक्रमास व्ही डी खैरे,डी डी चौगले, किरण गवाणकर, नगरसेवक सुनिल रणवरे, महादेव साळोखे,बाजीराव खराडे,प्रा.एम ए कोळी, आर डी चौगले, सदाशिव एकल, तुकाराम भारमल, प्रा.चंद्रकांत जाधव,प्रा.पी एस सारंग, रणजितसिंह सासने, डी. बी. देसाई, प्रदिप वर्णे,रामचंद्र रणवरे आदिंसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.