मुरगूडच्या गणेश नागरी पतसंस्थेच्या ठिकपूर्ली येथे सहाव्या शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सर्व परिचीत असणारी श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहाव्या शाखेचा उदघाटन सोहळा ठिकपूर्ली ता . राधानगर येथे दिमाखदार व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.

Advertisements

    लोकनेते स्व . खा . सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशिर्वादाने व सर्वांच्या सहकार्यामुळे ठिकपूर्ली येथिल नूतन शाखेचे उदघाटन मा .विरेंद्र मंडलीक ( भैया ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Advertisements

     यावेळी विजयसिंह बलुगडे (जिल्हाप्रमुख शिवसेना -शिंदे गट ), विक्रमसिंह आबिटकर, हिन्दूराव चौगले, नामदेवराव मेंडके, शिवाजीराव चौगले, जयशिंग भोसले, अॅड खाशाबा भोसले , राजाराम पाटील कुरुलीकर , त्याचबरोबर उपनगध्यक्षा रेखाताई मांगले , नगरसेविका वैशाली गोधडे , संध्या पाटील , ठिकपूर्ली गावचे सरपंच प्रल्हाद पाटील या मन्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.   

यावेळी विरेंद्र मंडलिकानीं संस्थेच्या वाटचालीचे व संस्थेच्या प्रगतीचे कौतूक केले . ते म्हणाले श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेने विश्वासार्ह दिलेली सेवा, आर्थिक शिस्त आणि सभासदांच्या हिताच्या केलेल्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमुद केले . त्याचबरोबर विजयसिंह बलुगडे यानीं संस्थेच्या गतीमान प्रगतीबाबत माहिती सांगून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

Advertisements

    ठिकपूर्ली येथे सुरु केलेली शाखा संस्थेच्या विकासाठी महत्वपूर्ण टप्पा ठरणार असून नागरीकानां विविध आर्थिक व बँकींग सुविधा सुलभपणे उपलब्ध होणार आहेत अशा भावना अनेक हितचिंतकानी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.

   या शाखेच्या उदघाटन प्रसंगी विद्यमान चेअरमन सोमनाथ यरनाळकर, व्हा. चेअरमन राजाराम कुडवे, संचालक सर्वश्री उदयकुमार शहा, एकनाथ पोतदार, आनंदा देवळे, मारूती पाटील, सुखदेव येरुडकर, प्रकाश हावळ, आनंदा जालिमसर, दत्तात्रय कांबळे, संचालिका सौ. रुपाली शहा, सौ. रेखा भोसले, कार्यलक्षी संचालक राहुल शिंदे, सेवक वृंद व सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महादेव कानकेकर सर यानीं केले तर उपस्थितांचे आभार अँड खाशाबा भोसले यानी मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!