कागल : कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सहआयुक्त नगरपालिका प्रशासन विभागाचा जादा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
Advertisements
कागल गेली दोन वर्ष नगरपालिकेत अजय पाटणकर हे मुख्याधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यांनी पालिकेच्या कारभारात अतिशय चांगल्या सुधारणा घडवून आणल्या आहेत. तसेच, लोकहिताच्या विविध योजना राबवून यशस्वी केल्या आहेत.
Advertisements

जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी अजय पाटणकर यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील देवानंद ढेकळे यांच्याकडे सोपविण्यात आलेला जिल्हा सहआयुक्त नगरपालिका प्रशासन शाखेचा अतिरिक्त कार्यभार पाटणकर यांच्याकडे सोपविला आहे.