मुरगूडच्या विकासकामांसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

मूरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील विविध विकासकामे व नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आज दिग्विजयसिंह पाटील व वीरेंद्र (भैय्या) मंडलिक यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

Advertisements

यावेळी मुरगूडमधील बेघर नागरिकांना घरे मिळावीत, तसेच शासनाच्या नियमानुसार पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ शासकीय जमिनीवर घरांचे अतिक्रमण असलेल्या पात्र अतिक्रमणधारकांची घरे लवकरात लवकर त्यांच्या नावे करून देण्यात यावीत, याबाबत विशेष निवेदन देण्यात आले.

Advertisements

तसेच मुरगूडमध्ये रजिस्टर ऑफिस, भूमापन कार्यालयासह महसूल विभागाशी संबंधित सर्व कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावीत, जेणेकरून नागरिकांची गैरसोय दूर होऊन शासकीय कामकाज अधिक सुलभ होईल, अशी मागणीही करण्यात आली.

या भेटीदरम्यान मुरगूडचे नूतन नगरसेवक सम्राट मसवेकर तसेच भाजपा कामगार आघाडीचे प्रतिनिधी भोला लोहार उपस्थित होते.

Advertisements

मुरगूडच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी या भेटीत सकारात्मक चर्चा झाली.

Leave a Comment

error: Content is protected !!