गणेशोत्सव, ईद -ए – मिलाद सणाच्या अनुषगाने पोलिसांचा रुटमार्च

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड पोलीसानी सार्वजनिक .गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद  सण उत्सवाच्या अनुषंगाने आज दिनांक २५-०८- -२०२६ रोजी १५.३०  वा . ते १६.५०  वा . या  मुदतीत एसटी स्टँड मुरगुड परिसर या ठिकाणी दंगल काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली .सदर दंगल काबू योजना प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर मुरगुड एसटी स्टँड- तुकाराम चौक -शिव शंभू शासन चौक- मुख्य बाजारपेठ -कबरस्थान मशीद रोड या मार्गावरून मुरगूड पोलीस ठाणे असा रुटमार्च काढण्यात आला.

Advertisements

             कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आलेल्या सदर दंगल काबू योजना व रूट मार्च करिता मुरगुड पोलीस ठाणे कडील २ अधिकारी , १५ पोलीस अंमलदार व २३ होमगार्ड सहभागी झाले होते. तसेच मुरगूड ग्रामीण रुग्णालय कडील वैद्यकीय अधिकारी व ॲम्बुलन्स पथक, मुरगुड नगरपरिषद कार्यालयाकडील अग्निशामक दल पथक उपलब्ध ठेवण्यात आलेले होते.सदरची रंगीत तालीम घेऊन सर्व अधिकारी ,पोलीस अंमलदार व उपस्थित लोकांना रंगीत तालीम चा आशय व उद्देश समजावून सांगितला .

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!