पत्रकारांबाबत अवमानकारक वक्तव्य; खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात मुरगुड शहर पत्रकार संघातर्फे तिव्र निषेध

मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मुरगुड शहर पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन मुरगुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांना देण्यात आले.

Advertisements

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव कानकेकर यांनी बोलताना, “पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार करत असतात. अशा पत्रकारांचा अवमान करणारी वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत,” असे ठाम मत व्यक्त केले.

Advertisements

              अनिल पाटील यांनी बोलताना सांगितले की संजय दिना पाटील याचा जेवढा करावा तेवढा निषेध कमीच आहे पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीवरती बोलणाऱ्या या खासदाराचा राजीनामा घेतलाच पाहिजे अन्यथा असे प्रकार वाढत राहतील पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते आणि या स्तंभाचा अवमान होत असेल तर सर्वांनीच पुढे येऊन याचा निषेध केला पाहिजे.

       यावेळी प्रा. रवींद्र शिंदे,  प्रकाश तिराळे आणि दिलीप निकम यांनीही निषेधपर मनोगत व्यक्त करून पत्रकारांचा सन्मान राखला जावा, अशी मागणी केली. या प्रसंगी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जोतीराम कुंभार, सचिव संदीप सूर्यवंशी, प्रा. सुनील डेळेकर, प्रा. शाम पाटील, समीर कटके, प्रवीण सूर्यवंशी, शशी दरेकर ,राजू चव्हाण, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, विजय मोरबाळे, अविनाश चौगुले, भैरवनाथ डवरी आणि अँथोनी बारदेस्कर उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!