मानवी जीवन निरोगी, सुदृढ होण्यासाठी योगाचे आचरण करणे आवश्यक – गजानन गंगापूर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मानवी जीवन निरोगी व सुदृढ होण्यासाठी योगाचे आचरण करणे आवश्यक आहे. आपल्या देशाच्या यशस्वी प्रयत्नामुळेच जगात जागतिक योग दिन साजरा होतो असे प्रतिपादन जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष श्री. गजाननराव गंगापूरे यानीं केले.

Advertisements

      मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने ” जागतिक योग दिनाचे ” औचित्य साधून जेष्ठानां मार्गदर्शन करतानां सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते .

यावेळी योग मार्गदर्शक जयवंत हावळ यानीं मन व शरीर निरोगी रहाणेसाठी प्रत्येक जेष्ठानी योगासने नियमितपणे करण्याची गरज असल्याचे सांगून त्यानीं दि .१६ ते २१ जुन २०२६ अखेर घेण्यात आलेल्या शिबिरात जेष्ठानां मान, पाठ, कंबर, हात – पाय, खांदे, डोळे, चेहरा इत्यादीवर योग प्रकार प्रात्यक्षिकाव्दारे समाजावून सांगून अनेक प्राणायम जेष्ठांच्याकडून करवून घेतले.

Advertisements

याप्रसंगी योग मार्गदर्शक जयवंत हावळ यानीं योग शिबीर उत्तम प्रकारे घेतलेबदल संघाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

         या शिबिराचा संचालक , व सदस्य, जेष्ठानीं लाभ घेतला. जेष्ठांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी गेल्या ३ वर्षापासून नियमितपणे रोज सकाळी ७ ते ८वेळेत योगवर्ग भरविला जात आहे हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत अनेक जेष्ठानी व्यक्त केले. शेवटी सचिव सखाराम सावर्डेकर यानीं उपस्थितांचे आभार मानले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!