मुरगूडमध्ये गांजाप्रकरणी तळंदगेचा मास्टरमाईंड व मुरगुडातील दोघांसह तिघांना अटक

मुरगूडमध्ये गांजाप्रकरणी तळंदगेचा मास्टरमाईंड व मुरगुडातील दोघांसह तिघांना अटक

मुरगूड पोलिस गांजा प्रकरणी ॲक्टिव्ह मोडमध्ये :१ लाख १० हजार चा मुद्देमाल जप्त

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगूड पोलिस गांजा प्रकरणी ॲक्टीव मोडमध्ये असून आज गांजा विरोधातील कारवाईत पोलिसांना मोठे यश मिळवत विक्रीसाठी गांजा ठेवलेल्या येथील दोघा संशयितांना पहाटे तर या प्रकरणातील मास्टरमाईंड अशा तिघांना अटक केली. या कारवाईमध्ये बाजारभावानुसार सुमारे ६२ हजार रु. किमतीचा गांजा, दोन मोबाईल हॅण्डसेट आणि मोटारसायकल असा सुमारे १ लाख १० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisements

         पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आज शनिवारी पहाटे मुरगूड शहरातील दोन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून विक्रीसाठी आणलेल्या गांजासाठ्यासह रवि राजू डोंबारी (वय ३०) आणि विजय विलास भोई (वय २०) दोघेही रा. मुरगूड, ता. कागल यांना ताब्यात घेतले. घरझडती व अंगझडतीतून दोघांकडून १ किलो ५९२ ग्रॅम वजनाचा गांजा, दोन मोबाईल हॅण्डसेट आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख १० हजार ६८० रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेड़ कॉन्स्टेबल बजरंग ज्ञानदेव पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

          अटकेतील आरोपींची कसून तपास केल्यानंतर या प्रकरणाचा मास्टरमाइंड तळंदगेमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला सायंकाळच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली.  या प्रकरणातील अटक केलेल्या विजयी भोई यांने आपण हा गांजा विक्रीसाठी शिवाजी पोपट शिंगाडे रा. तळंदगे ता. हातकणंगले याच्या कडून  खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायंकाळी ६. ४१ वा. तळंदगेच्या शिवाजी शिंगाडे यालाही अटक केली. त्यामुळे याप्रकरणी अटकेतील आरोपींची संख्या ३ वर गेली.

       अटकेच्या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारे, पोलीस हवालदार बजरंग पाटील, अमर पाटील, सुनील देसाई , विलास पाटील, पोलीस अंमलदार राहुल केणे, खुशाल शिंदे, प्रफुल्ल कांबळे या पोलिस पथकाने ही धडक कारवाई केली.
      

Advertisements

रात्रीस खेळ चाले

         मुरगुडात अलीकडील काही वर्षात मोठ्या प्रमाणात गांजाची खरेदी -विक्री होत आहे. अख्खी पिढीच्या पिढी यामध्ये बरबाद होत चालली आहे. हे उघडगुपीत चर्चेमध्ये  आहे. दिवसभर यावर गांभीर्याने चर्चा होत असली तरी पुन्हा ‘गांजाचा रात्रीच खेळ चाले’ याबाबत नव्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही गंभीर बाब कानावर घातली. आणि सपोनी क्रांती पाटील व सहकारी पोलिसांनी या धडाकेबाज मोहिमेस आरंभ  केला. याबद्दल नागरिकांमध्ये कौतुक होत आहे.

  • Please, check code will be mailed to the Amazon registered email ID within 2 hours of ordering, or check ‘Buyer/Seller m…
  • Cash on delivery is not available and this item is non-returnable. This software works on devices with India IP addresse…
  • SIA – your Security Assistant for a simpler, stress-free experience. Provides Instant Answers, Feature Walkthroughs, Pro…
₹2,000

Leave a Comment

error: Content is protected !!