मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल सर्वपरिचीत असणारी मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिंगनुर येथिल सेवाकार्यालयातील सभासदानां वाहन खरेदी हायर परचेस योजनेअंतर्गत तीन मॅजिक एक्सप्रेस या वाहनांचे वितरण मुख्य शाखेच्या प्रांगणात करण्यात आले.
सदर वाहनांचे पूजन चेअरमन , व्हा . चेअरमन , संचालक यांच्या शुभहस्ते करण्यात येऊन कर्जदारानां वाहनांच्या चाव्या सुपूर्त करण्यात आल्या .

या वाहन वितरण प्रसंगी संस्थापक हाजी धोंडीबा मकानदार म्हणाले संस्थेच्या एकूण ठेवी १६ कोटी पर्यंत पोहचल्या असून अल्पावधीत आजरा येथे पहिल्या शाखेची सुरुवात केली आहे . मुरगूडच्या मुख्य शाखेसह , आजरा शाखाही सभासद ,ठेविदार , व हितचिंतक यांच्या विश्वासास पात्र राहून कार्यक्षम बनत सहकार क्षेत्रात गतीमान होत आहे . पुढे ते म्हणाले लिंगनुर बरोबरच लवकरच आदमापूर ( ता. भुदरगड ) येथे दुसरे सेवा केंद्र कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे त्यानीं सांगितले .
या वाहन वितरण प्रसंगी चेअरमन जावेद मकानदार , सचिन मेंडके , मारूती कांबळे , रविराज शेट्टी , असिमखान जमादार , विशाल भोपळे, निवास कदम, महादेव बिद्रे, महेश कुंभार , यांच्यासह संचालक मंडळ, सभासद, कर्मचारी वर्ग , नागरीक उपस्थित होते .
स्वागत व प्रास्ताविक मॅनेजर अजितकुमार कापशे यानीं केले तर आभार ऋषी गोडबोले यानीं मानले .