मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेत कु .पूर्वा कृष्णात पाटील हीचा नुकत्याच झालेल्या दहावी परिक्षेत ९५ टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केलेबद्दल पतसंस्थेच्या मुख्य शाखेत तिचा यथोचित सत्कार करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , बुके देऊन पूर्वाचा सत्कार करण्यात आला .

संस्थेचे कर्मचारी कृष्णात पाटील यांची ती कन्या असून सध्या बोरवडे येथिल इव्हेटी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे .
या सत्कार प्रसंगी व्हाईस चेअरमन श्री. प्रकाश सणगर, संस्थेचे संचालक सर्वश्री नामदेव पाटील, प्रशांत शहा, शशी दरेकर, साताप्पा पाटील, किशोर पोतदार, हाजी धोंडीबा मकानदार, निवास कदम, संदीप कांबळे संचालिका सौ. रोहिणी तांबट, सौ. सुनंदा जाधव यांच्यासह संस्थेचे कार्यलक्षी संचालक श्री सुदर्शन हुंडेकर शाखाधिकारी जयसिंग कांबळे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.