मुरगूडात ८ मे रोजी महाराजस्व समाधान शिबिर

मुरगुड (शशी दरेकर) : येत्या गुरुवार दि. ८ मे रोजी सकाळी ९ . ३० वा. महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागामार्फत तहसीलदार कार्यालया अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन चिमगाव रोड येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Advertisements

          राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा -१ ) राबविण्याबाबत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

Advertisements

        या शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित भोगवटादार वर्ग २ जमीनी वर्ग १ करणे, सामाजिक अर्थ सहाय्य योजना अंतर्गत लाभार्थ्याचे अर्ज भरुन घेणे, मंजूर करणे, तुकडेबंदी सुधारणा नुसार प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या हस्तांतरण नोंदी मंजूर करणे, वय, नॅशनॅलीटी ‍, डोमिसाईल, उत्पन्न,‍ रहीवास, जात आणि इतर विविध दाखल्यांचे वाटप, फेरफार नोंदींचा निपटारा, अभिलेख दुरुस्ती , हेल्प डेस्क, नवीन महसूल सुधारणांची माहीती, तसेच बळीराजा पाणंद रस्ते मोहीम, कमी जास्त पत्रक तयार करणे या सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पुरवठा विभागाकडील संगणकीकृत शिधा पत्रिकाचे वाटप होणार आहे.

आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असून कृषी विभागामार्फत शेती अवजारे यांचे लाभ वाटप तसेच पीएम किसान, ॲग्रीस्टॅक नोंदणी होणार असून इतर कृषी विषयक बी बियांणाची माहीती देण्यात येणार आहे. महीला व बालविकास विभागार्तगत प्रधान मंत्री मातृवंदना योजना, घरपोच आहार, लेक लाडकी योजना, बेटी बचाव बेटी पढाओ व बाल आधार योजनांचा लाभ व माहीती देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत विभाग यांचेकडील विविध योजनांची माहीती व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तसेच आधार अद्यावतीकरण, बचत गट यांच्या सेवा देण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार कार्यालय, कागल यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!