मुरगूड नागरी पतसंस्थेच्या आजरा शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहाच्या वातावरणात संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात १५ कोटी ठेवीचा टप्पा पुर्ण करणाऱ्या मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजरा शाखेचा उदघाटन सोहळा शुक्रवारी मोठ्या थाटामाटात व उत्साहाच्या वातावरणात अण्णाभाऊ संस्था समुहाचे अध्यक्ष अशोक अण्णा चराठी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक हाजी बाळासाहेब मकानदार हे होते.

Advertisements

   शाखेच्या उद्घाघान प्रसंगी चराटी म्हणाले मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेने अल्पावधित प्रगतीच्या दिशेने गरूडझेप घेतली आहे. जावेद मकानदार यानी या संस्थेची दिड वर्षापूर्वी स्थापना करून १५ कोटी २४ लाखाच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे. ११ कोटी ४० लाखाचे कर्जवाटप करुन ५ कोटी २४ लाख रु. सोने तारण कर्ज वितरण करण्यात आले आहे. संस्थेच्या अल्पकाळातील गरूडझेप ही अभिमानाची गोष्ट आहे असे नमुद केले.

Advertisements

     यावेळी चेअरमन जावेद मकानदार यानीं संस्था स्थापनेपासूनची संपूर्ण माहिती व सभासदाच्या हिताचे निर्णय घेतल्याचे सांगितले.    यावेळी संस्थापक हाजी बाळासाहेब मकानदार यानी सभासद, ठेवीदार यानीं दिलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमास मा. निजामभाई लाडजी (उद्योग आजरा -गोवा), मा. सुजय येजरे साहेब (सहाय्यक निबंधक आजरा), शिवसेना(उबाठा) उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, दशरत अमृते, कारखाना संचालक रशिद पठाण, समीर गुंजाटी, निसारभाई लाडजी, जुबेर भाई चांद, मुनाफा खेडकर, मजीद मुराद, नवीज खेडेकर, सिकंदर दरवाजकर, आरिफभाई खेडकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

या कार्यक्रमासाठी मुरगूड नागरी सह .पतसंस्थेचे व्हा. चेअरमन मधुकर कुंभार , मॅनेजर अजितकुमार कापशे ,आजरा शाखेचे शाखाधिकारी मा. मोहसीन मुराद व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, सभासद, ठेवीदार, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!