मुरगूडमध्ये निवृत्त शिक्षकाचे चार लाखांचे दागिने भुलथापा लावून लांबवले

मुरगूड बाजारपेठेतील गणेश मंदिराजवळ प्रकार

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड बाजारपेठेतील गणेशमंदिराजवळ सोमवारी सांयकाळी एका अनोळखी भामटयाने एका सेवानिवृत्त शिक्षकाला त्यांच्याकडील भूलथापालावून चार लाखांचे दागिने  घेऊन पोबारा केला.

Advertisements

निवृत्त शिक्षक विश्वनाथ भिवाजी शिंदे (वय ७५) यांच्या बोटातील अर्ध्या तोळ्याच्या दोन अंगठया आणि गळ्यातील दीड तोळ्याची चेन असा ४ लाख किंमतीचे दागिने घेऊन भामटा पसार झाला.

Advertisements

   सोमवारी सायंकाळी शिंदे नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारून पायी जुन्या घरी जात होते. बाजारपेठेतील गणेश मंदिराजवळ आले असता एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ येऊन ” काका काल काय घडले तुम्हाला माहित आहे की नाही १़ असे सांगून अंगठ्या  व चेन काढून कागदात पुडी बांधायला सांगितले.

यावेळी त्या भामटयाने हातचलाखी करत खऱ्या दागिन्याची पुडी स्वःताकडे घेतली आणि नकली दागिन्याची पुडी शिंदे यांच्याकडे देत हा भामटा तेथून पसार झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!