कागल(प्रतिनिधी): मंत्री नवाब मलिक यांनी हसीना पारकर यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीचे पैसे दाऊद इब्राहिमने बॉम्बस्फोट करण्यासाठी वापरले हे कृत्य देशद्रोही आहे . त्यामुळे नवाब मलिक यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायला हवा. मालिकांचा राजीनामा जोपर्यंत घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे दिला.
ते पुढे म्हणाले, मंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली . त्यावेळी कोणीही मंत्री रस्त्यावर उतरले नाही.मात्र नवाब मलिक सारख्या देशद्रोही च्या समर्थनार्थ सर्वजण एक होत आहेत या पाठीमागील गौडबंगाल काय ?
हा विषय भ्रष्टाचाराचा नाही तर देशद्रोहाचा आहे. नवाब मलिक यांच्या प्रतिमेला चपलाने मारून कोल्हापुरी चप्पलचा अपमान करू नका. मलिकांची तेव्हढीही लायकी नाही. देशद्रोही मालिकांचा राजीनामा झालाच पाहिजे.
कागल तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कागल शहरात गैबी चौक ते बरस्थानकापर्यंत निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी घाटगे बोलत होते. या निषेध फेरीत महाविकास आघाडी सरकारच्या व नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मालिक यांच्या प्रतिमेला जोड्याने मारहाण केली.
वाईन विकायला वेळ विजप्रश्नावर निर्णय घेण्यास वेळ नाही
समरजितसिंह घाटगे म्हणाले, वाईन विकायला वेळ आहे. गेले कित्येक दिवस आंदोलन करीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडे बघायला तुम्हाला वेळ नाही . शेतकऱ्यांच्या ५० हजार अनुदानाची काळजी नाही . विजप्रश्नावर निर्णय घेण्यास वेळ नाही. यासाठी महाविकास आघाडीचे मंत्री रस्त्यावर आले नाहीत. मग देशद्रोही मंत्रांच्या समर्थनार्थ एक व्हायला याना वेळ कसा ?
नवाब मलिक यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत मंत्र्यांना आम्ही स्वस्थ बसू देणार नाही. राष्ट्रवादी नावाचा मान राखा. आतंकवाद्यांना पाठिंबा देवून राष्ट्रवादी व शरद पवार यांच्या नावाला गालबोट लावता.
पहिले राष्ट्रवादी आहात का ते तपासून घ्या असा टोला ही मुश्रीफ यांचे नाव न घेता श्री घाटगे यांनी लगावला.
यावेळी अरुण सोनूले, बाळासाहेब जाधव, रमिज मुजावर, असिफ मुल्ला, राजेंद्र जाधव, बजेपी तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शाहू चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे संचालक बॉबी माने, युवराज पाटील, सचिन मगदूम, प्रताप पाटील, संदीप भुरले, विवेक कुलकर्णी, बाबुराव पाटील, अरुण गुरव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार बाबगोंड पाटील यांनी मानले.
गंगाजल शिंपडून ही जागा पवित्र करा
कालच याठिकाणी देशद्रोही नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला देशद्रोही माणसाच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चाने छ.शिवाजी महाराज पुतळा परिसर अपवित्र झाली आहे त्यावर गंगाजल शिंपडून हा परिसर पवित्र करा असे ही घाटगे म्हणाले.