श्री लक्ष्मीनारायणच्या मुख्य शाखेत गौतम कांबळे यांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे सरवडे शाखेकडील कर्मचारी गौतम बाबुराव कांबळे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा ३२ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेबद्धल सपत्नीक यथोचित सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला.

Advertisements

त्यांच्या निवृत्ती सत्कारप्रसंगी चेअरमन किशोर पोतदार म्हणाले गौतम कांबळे यानीं संस्थेच्याप्रगतीसाठी बहुमोल असे योगदान दिले आहे. त्यानी दिलेले हे योगदान संस्था कदापी विसरणार नाही. त्यांच्या कार्यपद्धतीचे इतर कर्मचारी वर्गानेही अनुकरण करावे असे ते म्हणाले.

Advertisements

या निवृत्ती कार्यक्रम समारंभप्रसंगी उपसभापती दत्तात्रय कांबळे तसेच जेष्ठ संचालक जवाहर शहा, पुंडलिक डाफळे , अनंत फर्नांडिस, दत्तात्रय तांबट, रविंद्र खराडे , विनय पोतदार, चंद्रकांत माळवदे, रविंद्र सणगर, तज्ञ संचालक जगदिश देशपांडे, संचालिका सौ. सुजाता सुतार, सौ. सुनिता शिंदे, श्रीमती भारती कामत, जनरल मॅनेंजर नवनाथ डवरी, सचिव मारूती सणगर यांच्यासह सर्व सेवक वृंद उपस्थित होते,

Leave a Comment

error: Content is protected !!