वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मुरगूडमध्ये महारक्तदान शिबिर

मुरगूड ( शशी दरेकर ) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मुरगूड शहर यांच्या वतीने भव्य महारक्तदान व वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनाच्या मनोगतात शिल्पा खोत म्हणाल्या, “सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मुश्रीफ यांच्याकडून मिळालेली ही राजकीय ताकद वापरण्यास आपण कटिबद्ध आहोत. मुश्रीफसाहेबांच्या रूपाने लाखो लोकांचे आशीर्वाद, चैतन्य आणि प्रेरणा आम्हाला पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देत राहतील.”

गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनी आपल्या भाषणात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले, “रक्तदान कधीही वाया जात नाही.रक्तदान हा जीव वाचवणारा सर्वोत्तम उपक्रम आहे. मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी २७ रोजी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले..”

Advertisements

प्रास्ताविक करताना राजेंखान जमादार म्हणाले, “शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व देणारे नेतृत्व म्हणजे मुश्रीफ साहेब. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी आयुष्यभर कार्य केले. शेंडापार्क येथे उभारण्यात येत असलेले मेडिकल हब हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न आहे.” तसेच कार्यकर्ते व नागरिक रक्तदान करून आपल्या नेत्यांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले.

Advertisements

दलितमित्र डी.डी.चौगले,दगडू शेणवी यांचे मनोगत झाले.स्वागत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजीत सूर्यवंशी यांनी,सूत्रसंचालन संग्राम साळोखे यांनी, तर आभार नंदकिशोर खराडे यांनी मानले.

शिबिराच्या आयोजन मुरगुड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले यावेळी नगरसेवक राजू आमते बजरंग सोनुले,संतोष वंडकर, विजय राजिगरे, संगीता चौगले,दगडू शेणवी ,रघुनाथ सूर्यवंशी,अनंत फर्नांडिस,वर्षाराणी मेंडके आदिती सूर्यवंशी,सोनाली कलकुटकी, सुनील घाटगे, भारत लाड, चंद्रकांत कुंभार,
लक्ष्मण चौगले,दत्तात्रय साळोखे,शंकर इंगवले, दिगंबर परीट, सुरेश गोधडे, अमर देवळे, डॉ सुनील चौगले, आपाजी मेटकर, दत्तात्रय जाधव, शाहू फर्नांडिस, सचिन मगदूम उपस्थित होते.

छत्रपती प्रमिलाराजे सर्व उपचार रक्तपेढी च्यावतीने हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.रोहित आर्वेकर,डॉ अंकिता सातव,डॉ प्रिया लोखंडे,रणजित केसरे,अमरदीप कोळी,आकांक्षा पाटील, अस्लम मुल्ला,अभिजित पाटील यांनी परिश्रम घेतले

Leave a Comment

error: Content is protected !!