मुरगूड ( शशी दरेकर ) : निपाणी मुरगूड मार्गावर जवाहरलाल तलाव मार्ग वळणाजवळ स्पीड बेकर अंदाज न आल्याने व दुचाकीवरचा ताबा सुटलयाने रस्त्यावर आपटून झालेल्या अपघातात सिंधुदुर्ग येथील युवक संकेत दिलीप चव्हाण वय ३८ मूळ गाव मुरगुड तालुका कागल सध्या राहणार तुळशी काटे जामसंडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग हा अपघातात ठार झाला.
संकेत हा जुन्या कार खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता तो आपल्या कुटुंबासमवेत हमिदवाडा तालुका कागल येथील नातेवाईकांच्याकडे वार्षिक यात्रेसाठी गेला होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास तो हमीदवाडा येथून नातेवाईकांची दुचाकी घेऊन निपाणी येथून येत होता मात्र वळणावर असलेल्या स्पीडबेकर न दिसल्याने संकेतचा दुचाकी वरचा ताबा सुटला तो रस्त्यावर आपटला त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

मुरगूड येथील युथ सर्कल मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांचा तो पुतण्या होता. रक्षाविसर्जन शुक्रवार दिनांक २७/३/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.