पाल्यांच्या गाण्यावर चक्क पालकच थिरकले
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथील लिटल मास्टर गुरुकुलम स्कूल मुरगूड यांच्यावतीने नुकतेच स्नेहसंमेलन दत प्रसाद हाॅल मुरगूड येथे संपन्न झाले.
स्नेहसमेलनांचे उद्घाटन मुरगूडच्या नगराध्यक्षा सौ सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले
तर प्रमुख पाहुण्या उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले व माजी नगराध्यक्षा शुभांगी गवाणकर ह्या होत्या.

सुरुवातीलाच लहान मुलां मुलींनी विविध बहारदार गीतावर व ठसकेबाज लावणीवर नृत्य सादर केले. चक्क पालकांसोबतच ठेका धरला जुन्या काळातील गाण्यांच्या ठेक्यावर पालक सुद्धा रमुन गेले.
सदर स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी चित्रपटातील गीते देशभक्तीपर डान्स, शिवाजी महाराज यांच्या वरील पोवाडे, कोळीगीते,भक्तिगीते विविध प्रकारच्या कवायती तसेच स्केटिंग डान्स व अबॅकस गणीते भावगीते सादर करून उपस्थितांची चांगलीच वाहवा मिळवली.
लहान चिमुकल्यांनी आपापल्या असणाऱ्या विविध कला गुणांची सादरीकरण करून तब्बल चार तास चांगलेच पालकांचे व प्रेक्षकांचे मनोरंजन केले सदर कार्यक्रमास मुरगूड नगरपालिकेचे गट नेते सुहास खराडे ,अनिल राऊत, विजय राजिगरे, सुनील रणवरे ,राहुल शिंदे सुनील मंडलिक, विक्रम गोधडे नगरसेविका गीतांजली आंगज सुजाता पुजारी,संजीवनी कांबळे निकेलीन बांरदेकर, सुरेखा लोकरे आधी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष आनावकर यांच्या हस्ते सर्व पाहुण्याचे शाल श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. नगरसेवक सुनील रणवरे यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित पालकामधुन आकर्षक लकी ड्रॉ पद्धतीने गिफ्ट देण्यात आले.
प्रास्ताविक मध्ये मुख्याध्यापिका सुमन अनावकर म्हणाल्या मुलांना सर्व आयत देऊ नका ,मुलांना संघर्ष करू द्या, आयतं मिळालेली मुलं जबाबदारी स्वीकारत नाहीत. स्वागत मनीषा पाटील यांनी तर सूत्रसंचालन संचली साळोखे यांनी केले, आभार अलका गायकवाड यानीं मानले.